पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाचा नवा वाद मा. सर्वोच न्यायालयाने दिला निर्णय | Bollywood Latest News

2021-09-13 1

गेल्या अनेक महिन्यांपासून पद्मावती या चित्रपटाबाबत वाद झडताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी याबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आपले सर्व दान सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशन यांच्या पदरात टाकले आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याचा वा न करण्याचा अंतिम निर्णय सेन्साॅर बोर्डाकडेच असेल. त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही असे थेट स्पष्टीकरण आज सर्वोच्च न्यायलयाने दिले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाला होता. राणी पद्मिनी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires